न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०१९) :- तामिळनाडूतील तीरापुरा येथे किक बॉक्सिंग फेडरेशन कप आणि राष्ट्रीय इंटर स्कूल आणि इंटर कॉलेज स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात ८० किलो वजनी गटात निलेश लुजनसिंग यादव याची निवड झाली आहे.
पर-राज्यातुन पोट भरण्यासाठी काळेवाडी परिसरात आलेले यादव कुटुंब आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, त्याचा स्पर्धेचा खर्च उचलवू शकत नाहीत. त्याचे पालक पिंपरी या ठिकाणी मिळेल ते काम करून, कुटूंबाची उपजिवीका भागवतात. त्यामुळे निलेश यादव हा स्पर्धेला मुकणार तोच शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले निलेश याच्या मदतीला धावून आले. त्यांनी निलेश व त्याच्या कुटुंबियांना धीर देत स्पर्धेचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली.
दाखले यांनी खेळाडू निलेश यादव यास तात्काळ पाच हजार रूपयांची रोख स्वरूपात मदत दिली व पुढे कोणतीही अडचण आली तर, मदत करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, रामभाऊ कवे, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, मारूती म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, दिपक पाटोळे, मनोज शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.


















