- शहराचा 96.64 टक्के; तब्बल सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थी फेल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२४) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. २१) बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा 96.64 टक्के निकाल लागला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून नऊ हजार 576 मुले आणि आठ हजार 607 मुली असे एकूण 18 हजार 183 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील नऊ हजार 537 मुलांनी तर आठ हजार 570 अशा 18 हजार 107 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बारावीच्या परीक्षेत नऊ हजार 122 मुले तर आठ हजार 377 मुली असे एकूण 17 हजार 499 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात मुलांचा निकाल 95.64 टक्के तर मुलींचा निकाल 97.74 टक्के लागला आहे. शहरात 415 मुले आणि 193 मुली असे एकूण 608 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.