न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे. (दि. २७ मे २०२४) :- कृष्णराव भेगडे शाळेने आपली उज्वल परंपरा कायम ठेवत शाळेचा निकाल शंभर टक्के लावला. यात कु. वरदायिनी डाळिंबकर हिने 94.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. नेहा मराठे 93.40%,( द्वितीय), हिंदवी ढोरे 93.20%, (तृतीय) , पूर्वा ढोरे 92.80% (चौथा क्रमांक), स्वराज ढोरे 92.80%( चौथा क्रमांक), धनंजय ठोकळ 92.60%( पाचवा क्रमांक) पटकावला.
परीक्षेसाठी शाळेचे एकूण 70 विद्यार्थी बसले होते. त्यातील 49 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत पास झाले. तर, त्यातील 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीतून पास झाले.
संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, संस्थेच्या संचालिका गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, पर्यवेक्षिका ज्योती सावंत व कीर्ती कुलकर्णी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.