न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- इयत्ता दहावीमध्ये सुदुंबरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालयाच्या भाग शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
तर, देहूतील संत तुकाराम विद्यालयाचा निकाल ९९.०५ टक्के लागला आहे. यामध्ये गाडे प्रणाली भरत (९३.०३), नायदे साक्षी शिवाजी (९०.४०), काळे आर्यन दीपक (९०.२०) टक्के गुण मिळविले आहेत.
दरम्यान दहावीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे आणि व्यवस्थापक चंद्रकांत जाधव यांनी अभिनंदन केले आहे.