न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा सलग पाच वर्ष शंभर टक्के निकाल लागला आहे. यात धनश्री पाथरकर ८१.२० टक्के, सोनाली परमार ८०.४० टक्के आणि मित कुरले ७९.४० टक्के प्राप्त केले आहेत. तर गुणवत्ता यादीमध्ये ०६ मुलांनी विशेष प्राविण्य मिळवले.
विद्यार्थ्यांना यश मिळावे, यासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक सचिन कळसाईत सर इयत्ता दहावीचे सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राचार्य नाजनीन शेख यांनी केले. संस्थचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.











