न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बोपोडी (१ मे २०१९) :- बोपोडी व जवळच्या परिसरांमध्ये डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डासांच्या चावण्यामुळे कित्येक भयंकर आजार होतात. मलेरिया सारख्या आजारांनी तर माणसाचा जीवही जाऊ शकतो.
नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. गेल्या वर्षी बऱ्याच लोकांना या आजारांची लागण झाली आहे. त्यामध्ये लहान मुले, तरुण मंडळी त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.
त्यामुळे येथील रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. प्रशासन व आरोग्य विभागाने या ठिकाणी तात्काळ पाऊले उचलावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकित नाईक यांनी केली आहे.











