न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०१९) :- १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” आणि “जागतिक कामगार दिन” म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तसेच १ मे हा “जागतिक कामगार दिन” म्हणूनही साजरा केला जातो.
परंतु, सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा मौसम चालू आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेचे सर्व टप्पे संपले आहेत. तरीही संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक कार्यक्रम संपत नाही व त्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत आचारसंहिता हटविली जाऊ शकत नाही.
त्यामुळे राज्यात व पिंपरी चिंचवड शहरातही महाराष्ट्र दिनाचे सर्व शासकीय व कामगार संघटनांचे कार्यक्रमही आचारसंहितेच्या गर्तेत सापडले आहेत.











