न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२४) :- कुदळवाडीतील पवार वस्तीत गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास व्ही-रब सस्पेन्शन्स प्रा. लि. या कंपनीला भीषण आग लागली. या कंपनीत रबर व ऑइलचा साठा होता. आगीत संपूर्ण कंपनी खाक झाली. ही कंपनी विजय नायर याची होती. आजूबाजूच्या पाच पत्राशेडचेही या आगीत नुकसान झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. कुदळवाडीत बुधवारी दुपारी रुद्र पॉलिमर्स या प्लास्टिकच्या गोदामाला आग लागली होती. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत होते.
ही आग आटोक्यात येत नाही, तोच गुरुवारी सकाळी ८ वाजता पवार वस्तीतील रबर, ऑइलच्या कंपनीला आग लागली. रबर, ऑइलचा साठा असल्याने या आगीने वेगाने पेट घेतला. अग्निशमनचे सुमारे १० बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीत लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले.










