न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानाला आळा घालण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक तर आहेच शिवाय वृक्षांचे जतन आणि संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमीत काळंगे यांनी केले.
पिंपळे सौदागर परिसरातील साई पर्ल सोसायटीमध्ये ग्रीन लाईफ या संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. शनिवार (दि. ८) रोजी सकाळी साई पर्ल सोसायटीमधील नागरिकांच्या हस्ते वड, पिंपळ, कडूलिंब, पेरु, आंबा, बकुळ, सोनचाफा आदी झाडांची रोपे लावण्यात आली.
याप्रसंगी ग्रीन लाईफ संस्थेचे संचालक राजेश मोरे, सोमेश प्रेम, तसेच साई पर्ल सोसायटीतील युवा कलावंत अमीत काळंगे यांच्या पुढाकाराने उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात श्रीकांत माने, अनिल कुलकर्णी, बाळासाहेब काटे, किशोर मेघानी, मधू मेघानी, वसंत भिरुड, प्रभाकर मोमीडवार, चंद्रकांत पवार, सुखदेव फुलेवाले, सुरेश खरात, राजेंद्रकुमार सुपे, तानाजी कांबळे आदींनी सहभाग दर्शविला.











