न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२४) :- लोणावळा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत सर्व प्रकारच्या जड वाहनांना कायमस्वरुपी बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
जड वाहनांमुळे लोणावळा शहरात गंभीर अपघात झाले आहेत. लोणावळ्यातील मनशक्ती केंद्र आणि खंडाळ्यातील बॅटरी हिल दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, मुंबई-पुणे महामार्गावरून जाणारी जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. लोणावळा शहरातून जाणाऱ्या जड वाहनांनी द्रुतगती मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











