न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२४) :- श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अग्नि(Red), जल(Blue), पृथ्वी(Green) आणि वायू (Yellow) या हाऊसनुसार पी.टी.युनिफाॅर्ममध्ये बोलावण्यात आले होते.
इ. तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. इ. सहावीतील नंदिनी सुळ हिने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. २१ जून या दिवसाचे भौगोलिक स्थान सांगून शरीर व मन यांचा सुंदर मिलाफ म्हणजे योग असेही तिने सांगितले.
शाळेतील क्रीडा शिक्षक अश्रफ शेख यांनी विद्यार्थ्यांकडून काही आसने करुन घेतली. यामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ॐकार, ताडासन, भद्रासन, वज्रासन, सुखासनआदि आसनांचा समावेश होता. या आसनांचा भार हलका करण्यासाठी हास्य योगाचे धडे विद्यार्थ्यांकडून गिरवून घेतले.
इयत्ता सहावीतील वेदांत शेळके याने आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
















