- वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अठरा सेवेचे पुणे येथे उद्घाटन..
- रिक्षा चालक ,कष्टकऱ्यांमार्फत पिंपरी ते पंढरपूर पर्यंत उपक्रमाचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२४) :- वारकऱ्यांच्या सेवेतच विठुमाऊलीचे दर्शन आम्हाला मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्याचा ध्यास आम्ही घेतला. त्यांना विविध प्रकारच्या १८ सेवा दिल्या जात आहेत. संघटनेचे पदाधिकारी या मध्ये सहभागी होतात. निगडी, पिंपरी बोपोडी आता पुणे, हडपसर येथे ही सेवा दिली जाणार आहे. पंढरपूर पर्यंत ही सेवा आम्ही देणार आहोत. वारकऱ्यांना सेवा देणे हे समाधान देणारे आहे. आगामी काळात इंद्रायणी नदी प्रदूषण रोखून संत भूमी टिकविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत व कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने दरवर्षी वारकऱ्यांना विविध प्रकारच्या १८ सेवा मोफत दिल्या जातत. या उपक्रमाचे व हेल्पलाईनचे उदघाटन १ जुलै २०२४ रोजी पार पडले. पुणे येथे वारकरी मुक्कामी असताना संत देवाजी बाबा मंदिरासमोर सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते हा उदघाटन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड मधील निगडी, पिंपरी येथून तर पुणे येथे संत देवाजी मंदीरा समोर वारकऱ्यांची सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महाराष्ट्र पंचायतचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास दिंडी क्रमांक 24 चे अध्यक्ष सुरेश सोनवणे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे बाळासाहेब ढवळे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण शेलार घर का महिला सभा अध्यक्ष अशा कांबळे, मधुरा डांगे, अंजली तांदळे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत वैद्य यांनी दोन लाखांपेक्षा अधिक रक्कमेची, औषधे, गोळ्या, वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहराध्य मोहम्मद शेख, कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, सल्लागार कुमार शेट्टी, सचिव किरण एरंडे, प्रवीण शिखरे, संजय शिंदे, विल्सन मस्के, नितीन भोंडवे, शाहरुख खान, विनय पाटील, संतोष गोसावी, अनिल वायदंडे, अमीर हमना यांनी केले.