- मेगापोलीस मायस्टीक येथील कारवाईत टोळकी जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२४) :- हिंजवडीतील मेगापोलीस मायस्टीक येथे (दि. २९/०६/२०२४) रोजी रात्री ९.५० च्या सुमारास स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी reddybook.blue ही ऑनलाईन वेबसाईट ग्राहकांना जुगार खेळण्यासाठी आरोपीने उपलब्ध दिली.
ऑनलाईन जुगार खेळतांना व खेळवीतांना आरोपी पोलिसांना मिळुन आले. दरम्यान घटनास्थळावरून आरोपी अविनाश वर्मा हा पळुन गेला.
दरम्यान आरोपी १) अनुराग अगरदास बंजारे (वय २० वर्षे रा. मेगा पोलीस मायस्टीक), २) धनंजय विश्वेश्वर पाल, ३) नवीन संजय गजभिये, ४) अमोस ओस्कर मिंज, ५) राहुल मदनसिंह कुमार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात ८०५/२०२४ भादवि कलम ४२०,४६४,४६५,४६८ प्रमाणे महा. जुगार कायदा कलम कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहेत.
सपोनि गोमारे पुढील तपास करीत आहेत.