न्यूज पीसीएमसी नेटवर्क
केपटाऊन (दि. 10 जुलै 2024) :- दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये नवीन अँटिव्हायरल औषधाचे वर्षातून दोन वेळा इंजेक्शन घेतल्याने महिलांमधील एचआयव्ही पूर्णपणे बरा झाल्याचे समोर आले आहे.
‘लेनकापावीर’ असे या औषधाचे नाव असून, ते लवकरच कमी दरात बाजारात येणार आहे. दररोज घेतलेल्या इतर दोन औषधी गोळ्यांपेक्षा ते अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. एचआयव्ही संसर्ग बरा करणाऱ्या इंजेक्शनची यशस्वी चाचणी झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये मोठ्या प्रमाणावर केलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असे दिसून आले आहे की वर्षातून दोनदा नवीन प्रतिबंधात्मक औषधाचे इंजेक्शन तरुण महिलांना एचआयव्ही संसर्गापासून पूर्ण संरक्षण देते. दर सहा महिन्यांनी ‘लेन्कापाविर’चे इंजेक्शन इतर दोन औषधांपेक्षा (दररोज घेतल्या जाणाऱ्या गोळ्या) एचआयव्ही संसर्गापासून चांगले संरक्षण देते का? हे शोधण्याचा प्रयत्न या चाचणीत करण्यात आला.
तिन्ही औषधे ‘प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस’ औषधे आहेत. युगांडामधील तीन ठिकाणी आणि दक्षिण आफ्रिकेतील 25 ठिकाणी 5,000 सहभागींसह ‘उद्देश 1’ चाचणीमध्ये लेन्कापावीर आणि इतर दोन औषधांच्या परिणामकारकतेची चाचणी घेण्यात आली.