- छताला टांगलेला फॅन कोसळून एकजण जखमी; चऱ्होलीतील घटना..
- निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून लाभार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चऱ्होली वार्ताहर (दि. 10 जुलै 2024) :- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चऱ्होली येथील 03 नंबर बिल्डिंग मधील अंगत शिवणे या सदनिका धारकाच्या राहत्या घरातील छताला टांगलेला चालू फॅन अचानक कोसळला. त्यात शिवणे यांच्या मुलाच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. हा प्रकार मंगळवारी घडला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. असे प्रकार सर्रास घडत असल्याने नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळून आलेली आहे.
पंतप्रधान आवास योजना बोऱ्हाडेवाडी व चऱ्होली येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या धर्तीवर साकरण्यात आलेला 1288 व 1,442 घरांचा गृहप्रकल्प आहे. या घरांचा ताबा मिळण्या अगोदरच तेथील लाभार्थी नागरिकांकडून सदनिकेच्या किमती गेल्या 2 वर्षापासून व्याजासह वसूल करण्यात आल्या. तरीदेखील तब्बल 2 वर्षाच्या काळानंतर ताबा मिळूनही अद्याप तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
ठिकठिकाणी तुंबलेले चेंबर, नागरिकांची पाण्याची वणवण, सदनिकेत छतातून टपकणारे पाणी, सांडपाणी/ मैला शुद्धीकरण याची दुर्गंधी, वीज गेल्यास पर्यायी सुविधा उपलब्ध नाही, पार्किंग सुविधा नाही, चेंबरचे पाणी जायला पाईपलाईन नाही, सार्वजनिक उत्सव समारंभ व उद्यान याचे काम अजून अद्याप झालेले नाही. पाण्याच्या टाकीची ऊंची जमिनीलगत असल्याने पावसाचे पाणी पिण्याच्या टाकीत जाण्याची शक्यता. STP मधून प्रक्रिया करून आलेले सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकाच ठिकाणी एकलगट असलेला साठा. भरधाव येणारी वाहने (गतिरोधक नाहीत) अशा अनेक विळख्यांनी वेढलली ही सोसायटी सोसायटी म्हणून आजच्या काळात वावरत आहे. यावर पालिका प्रशासन करवाही करणार का ? की एखादा बळी जाण्याची वाट बघणार ? असा सवाल लाभार्थ्यांना पडला आहे. तोडगा नाही निघाला तर लवकरच याचा भडका होऊन मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहू शकते.
छत गळणे, भिंतीतून पाणी पाझरणे तसेच कॉमन समस्या विषयी बोऱ्हाडेवाडी मोशी येथील लाभार्थीही त्रस्त असून, पालिका फक्त आम्ही करून देतो बोलतायत पण आतापर्यंत कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. तरी यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन सर्व पेंडिंग कामे पूर्ण करून द्यावेत. अन्यथा आम्ही चऱ्होली/ बोऱ्हाडेवाडी येथील एकत्रीत लाभार्थ्यांना घेऊन पालिकेवर मोर्चा काढणार आहोत.
– त्रस्त लाभार्थी, पंतप्रधान आवास योजना, चऱ्होली/ बोऱ्हाडेवाडी…