- वायसीएम रुग्णालयाचं डोकं ठिकाणावर आहे?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय म्हणजे शहरातील गरीबांचा आधार आहे. कमी खर्चात असाध्य आजारांवर इथे उपचार होतात. म्हणूनच शहराबरोबरच पुणे जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यात ख्यातीप्राप्त रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची ओळख आहे. परंतु, सद्यस्थितीत या रुग्णालयाचा ढिसाळ कारभार शहरवासीयांच्या आरोग्याशी प्रतारणा करीत आहे.
जिवंत नवजात बाळाचा स्मशान दाखला तयार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहेत. हा सर्व प्रकार २३ जुलै सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांचा आहे. २३ जुलै २०२४ रोजी महिलेने ५ वाजून २० मिनिटांनी बाळाला जन्म दिला. ते बाळ मृत जन्माला आल्याचं त्या कागदपत्रांमध्ये नमूद आहे. मग, संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटाला त्या बाळाचा स्मशान दाखला तयार करण्यात आला. ८:५६ ला बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
वायसीएम रुग्णालयात महिलेने नवजात बालकाला जन्म दिला. त्या नवजात बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. काही मिनिटांत त्याचा स्मशान दाखला तयार करण्यात आला. परंतु, नवजात बाळ हे जिवंत असून आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचं कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह रुग्णालय व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.











