न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२४) :- किवळेत अवघ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची माहिती किवळे पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अल्पवयीन मुलाने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात लॉग ऑफ, आय क्विट, मला सुसाईड नोट लिहिता येत नाही. अशा आशयाचा मजकूर आहे. त्यामुळे ही आत्महत्या कुठल्या गेम खेळण्यातून केली आहे का? या संदर्भात पिंपरी – चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलाचे वडील हे परदेशात असतात. अल्पवयीन मुलगा, आई आणि लहान भाऊ असे तिघेजण किवळे येथील सोसायटीत राहत होते.
















