न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील यशवंत प्राईड या इमारतीची सीमाभिंत आज शनिवारी अचानक कोसळली. त्यात भिंतीच्या ढिगाऱ्याखाली इमारतीलगत राहणारे दोन नागरिक व एक ६ वर्षाचा मुलगा अडकला होता.
नागरिकांनी अग्निशामक विभागास कळवले. तत्पूर्वी दोघाजणांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले व त्यांना पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले.
परंतु, अग्निशामक विभागाने शर्थीचे प्रयत्न करूनही त्या ६ वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यंत्रणेला अपयश आले. लोकेश ठाकूर असे त्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलाचे नाव आहे. महापालिकेच्या ड्रेनेजलाईनचे काम सुरु असताना, त्या इमारतीची सीमाभिंत अचानक कोसळून ही दुर्घटना घडली. अखेर त्या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू











