न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२४) :- शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत किवळे देहुरोड बाह्यवळण येथे शहर शिवसेनेने जोरदार स्वागत केलं.
ढोल ताशा वादनाने तसेच जेसीबी मधून पृष्पवृष्टी करून व फटाके वाजवून मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केल. शहर पदाधिकारी, महिला व शिवसैनिक मोठ्या संखेने भर पावसात उपस्थित होते.
या दरम्यान पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, युवासेना प्रमुख श्री. चेतन पवार, जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे, महिला शहर संघटिका अनिता तुतारे, शहर संघटक संतोष सौंदणकर, देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, उपजिल्हा प्रमुख वैशाली मराठे, उपशहर प्रमुख राजाराम कुदळे, उपशहर प्रमुख हरेश नखाते, अमित बाबर, विशाल यादव, विभागप्रमुख गोरख पाटील, विभागप्रमुख संजय वारे, उपशहर प्रमुख अमोल निकम, युवा सेनेचे समन्वयक संतोष म्हात्रे, उपशहर प्रमुख निखिल दळवी, समन्वयक गणेश आहेर, महिला विभाग संघटिका डॉ. वैशाली कुलथे आदींचा समावेश होता.














