न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२४) :- जमिनीच्या वाद आणि व कारचा कट मारल्याच्या कारणावरून ‘तुमच्या कुटुंबाला आज संपवुनच टाकतो’ असे म्हणत फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात आरोपी यांनी लोखंडी रॉड मारला. दुसऱ्या मुलाला पकडुन डोळयावर, डोक्यावर बुक्याने तसेच त्याला खाली पाडून लाथेने मारहाण केली. फिर्यादीच्या सुनेला लोखंडी रॉडने मारहाण करत असताना तीने उजवा हात मध्ये घातला. त्यामुळे हाताला मार लागुन फॅक्चर झाले आहे.
तसेच आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली आहे. फिर्यादीच्या कुटुंबाला आरोपी यांच्यापासून धोका असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. ११) रोजी सकाळी ११:०० वा. भुजबळ वस्ती, वाकड ब्रिज जवळ घडली.
विठ्ठल पांडूरंग भुजबळ (वय ६४ वर्ष, वाकड) यांनी आरोपी १) महिला २) महिला ३) महिला ४) महिला ५) महिला ६) महिला ७) कौस्तुभ भुजबळ, ८) अनंत चंद्रकांत भुजबळ ९) कुशाबा बबन भुजबळ, १०) महातु कुशाबा भुजबळ (सर्व रा- भुजबळ वस्ती, वाकड ब्रिज जवळ) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ९२८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९,३५२,३५१ (२),१२६(२), १८९(१), १८९ (४),१९१(२)१९०,११८ (१), ११८ (२) ११५ (२), मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कालम ३७(१) १३५ प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि महाले तपास करीत आहेत.














