न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात पालिकेने पाणी कपात जाहीर केली आहे. पण त्या आधीपासूनच अनेक सोसायट्यांना खासगी टैंकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. म्हणूनच सोसायट्यांची पाणी बिले माफ करावीत, अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छिद्र तापकीर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच पाणी कपात ओढवली आहे. महापालिकेत याआधी राष्ट्रवादीची सत्ता असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रत्येक बाबतीत लक्ष देत होते.
मात्र, भाजपची सत्ता आल्यापासून जनतेला कोणीच वाली राहिला नाही. भाजपचा पालिका प्रशासनावर अजिबात वचक नाही, असा आरोप तापकीर यांनी केला आहे.











