न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. दिवसाआड एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. संशयितांनाही टॅमिफ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे.
त्यानुसार सोमवारी (दि. ६) रोजी संशयितांना टॅमिफ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या वर्षी १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
अद्यापपर्यंत ३ हजार ५६७ संशयितांना टॅमिफ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. स्वाइन फ्लूची वाढती संख्या पाहता काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.











