न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२४) :- पिंपरीतील बौद्धनगर येथे गॅस गळती होऊन झालेल्या आगीच्या भडक्यात पाचजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. २१) सकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात घडली. जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनोज कुमार (वय १९), धिरज कुमार (वय २३), गोविंद राम (वय २८), राम चेलाराम (वय ४०) आणि सत्येंद्र राम (वय ३०, सर्व रा. बौद्धनगर, बिल्डींग नं. १६ च्या मागे, पिंपरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण ५० ते ६० टक्के भाजलेले आहेत. त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याप्रकरणी पिंपरी अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बौद्धनगर येथे बिल्डिंग नंबर १६ च्या मागे दहा बाय दहाच्या खोलीत हे पाच लोक राहत होते. त्यांच्या पाच किलो गॅस टाकीची वाहिनीला गळती लागली होती. त्याचा आगीशी संपर्क आल्याने मोठा भडका उडाला. त्यात हे पाच जण जखमी झाल्याची घटना घडली.