न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- राज्य शासनाच्या विविध योजनांचा राज्यात प्रचार व्हावा व प्रत्येक पात्र लाभार्थीना या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात प्रत्येक गावात मुख्यमंत्री योजनादूत नेमला जाणार आहे. या योजनादूताला प्रतिमहिना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला एक योजनादूत नियुक्त केला जाणार आहे.
इथे करा ऑनलाइन अर्ज…
मुख्यमंत्री योजनादूत होण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज भरावा लागणार आहे. आधार कार्ड, पदवी गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, बँक खाते, पासपोर्ट छायाचित्र, ऑनलाइन अर्जाच्या नमुन्यातील हमीपत्र अशी कागदपत्रे लागणार आहे.
संबंधित जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेणे, प्रत्यक्ष “फिल्ड”वर काम करणे. गावपातळीवर यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी प्रयत्न करणे, दरदिवशी केलेल्या कामाचा अहवाल ऑनलाइन अपलोड करणे आदी कामे असणार आहेत. मुख्यमंत्री योजनादूताला दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायतला फायदा होणार आहे.
निवडीचे निकष काय?..
■ १८ ते ३५ वर्षे वयोगट
■ कोणत्याही शाखेचा पदवीधर
■ संगणक ज्ञान
■ महाराष्ट्राचा रहिवासी,
■ आधार संलग्न बँक खातेधारक.