न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते चिखली येथील महापालिका शाळेत नुकतेच झाले.
शासकीय इमारतीमध्ये हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला जातो. पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) ने यापूर्वी १३ शाळांमध्ये राबविलेल्या रेन हार्वेस्टींग प्रकल्पामुळे शाळा सरासरी १ लाख ६६ हजार लिटर पाणी जमिनीत जिरवत आहेत. २२ शाळांच्या माध्यमातून भविष्यात ३१ लाख २८ हजार लिटर पाणी जमिनीत मुरविले जाणार आहे, असे पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, या प्रकल्पाद्वारे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत मिळणार आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक शासकीय इमारतीने रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. मात्र , आपल्याकडे पाणी मुबलक असल्यामुळे आपण कधी याचा केला नव्हता. आपण फक्त ग्रामीण भागात जलसंधारण करा, असे म्हणतो. पण शहरी भागाकडे दुर्लक्ष होते. शहरापुढे एक उदाहरण ठेवण्यासाठी महापालिकेच्या शासकीय इमारतीत हा प्रकल्प सुरु केला आहे.















