न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील अनधिकृत खासगी शाळांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये, पिंपरी चिंचवड शहरातील १५ अनधिकृत शाळा होत्या. मात्र, गेल्या वर्षी महापालिकेने शहरातील एकाच शाळांवर कारवाई केली असून, अद्यापपर्यंत १६ अनधिकृत शाळा सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महापालिकेने केवळ नोटीस पाठवण्याचे कागदी घोडे नाचवण्याचे काम केले असल्याने, अनधिकृत शाळांना कोणतेही भय राहिले नाही. बेधडकपणे देशाचे भविष्य मानल्या जाणा-या मुलांच्या भविष्यांशी खेळ केला जात आहे.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शहरातील अनधिकृत खासगी शाळांची यादी
ग्रँट मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल, मोशी
स्मार्ट स्कूल, मोशी प्राधिकरण
इंद्रायणी इंग्लिश स्कूल, साई पार्क दिघी
मास्टर केअर इंग्लिश स्कूल, भोसरी
ग्रँड मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल, चिखली
जयश्री इंग्लिश मिडीयम स्कूल, च-होली
मरिअम इंग्लिश मिडीयम स्कूल, भोसरी
ज्ञानराज प्राथमिक स्कूल, कासारवाडी
बुध्दीस्ट इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल, कासारवाडी
सेंट मेरीज ज्यूनिअर प्रायमरी स्कूल, पिंपळे निलख
शुंभकरोती इंटरनॅशनल स्कूल, चिंचवडगाव, गांधी पेठ
एंजल्स प्राथमिक स्कूल, पिंपळे निलख
मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी
ब्लू रोज इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
बालगोपाळ माध्यमिक शाळा, पिंपरी
पर्ल ड्राप स्कूल, पिंपळे निलख











