न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२४) :- फायनान्स कंपनीकडून दहा कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवले. लोनसाठी कंपनीचा प्रतिनिधी आरोपी क्र १ यास तक्रारदार यांनी बँकेचा फायनान्सच्या नावाने १५०० रुपयांचा आणि ७०० रूपयांचा चेक दिला. आरोपी यांनी चेकवरील शाई खोडुन त्यावर खाडाखोड केली. तो चेक सातारा येथील बँकेमध्ये वटवुन एकूण २१,४५,००० रुपये ट्रान्सफर करुन घेतले. बेअरर चेक देवुन अकाउंटमधुन ९,००,००० रुपये काढुन घेतले. तसेच ५०,००० रुपये व २५,००० रुपये एटीएममधुन काढले. तक्रारदाराला कोणत्याही प्रकारची लोन रक्कम न देता एकुण ३१,२०,००० रुपयांची तिघांनी फसवणूक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.११/०६/२०२४ रोजी ते दि.२५/०७/२०२४) दरम्यान शाहूनगर, चिंचवड येथे घडला. संजय हरिभाऊ शेटे (वय ५१ वर्षे, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, शाहूनगर, चिंचवड) यांनी आरोपी १. संतोष भोसले, वय ३५ वर्षे अॅरेना फायनान्स कंपनीचा माणुस, २. गणेश साहेबराव लांडगे, आयडीबीआय खातेधारक, ३. गणेश गोविंद फडके (वय ४९ वर्षे, रा पुर्णानगर, चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ४७८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४),३३८,३३६ (३),३४०(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पाठारे पुढील तपास करीत आहेत.











