न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२४) :- मित्राने तरुणाला घरी बोलावून घेत ‘तु मागच्या महीन्यामध्ये २६ तारखेस कॉलेजमधील कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमामध्ये परिक्षित भंडारी यास का ढकलले’ याचा जाब विचारला. आठ जणांच्या ग्रुपने त्याला शिवीगाळ करून हाताने आणि पट्टयाने मारहाण केली. ‘तु जर कोठे आमची तक्रार केली तर तुला पाहुन घेतो अशी धमकी दिली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.२६) रोजी पहाटे ०२:०० वा.चे सुमारास गहुंजे येथे घडला. अरुण मोहनसिंग प्रतापसिंग (वय-१९ वर्षे, धंदा-शिक्षण, रा, गहुंजे) याने आरोपी १) परिक्षित भंडारी रा. लोढा बेलमोडो सोसायटी, गहुंजे, २) ध्रुव नस्ला (रा. लोढा बेलमोडो सोसायटी, गहुंजे), ३) आर्या मिश्रा (रा. लोढा बेलमोडो सोसायटी, गहुंजे), ४) कार्तिक गुप्ता (रा. लोढा बेलमोडो सोसायटी, गहुंजे), ५) मियाँ खान (रा. देहूरोड), ६) हसन शेख (रा. देहूरोड), ७) अभिनव माळी (लोढा बेलमोडो सोसायटी, गहुंजे), ८) सिद्धार्थ यादव (लोढा बेलमोडो सोसायटी, गहुंजे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
शिरगाव पोलिसांनी २१९/२०२४ भा.न्या.सं. कलम ११८ (२),११५,१८९(२),१८९ (८),१९१(१),१९१(२),३५२,३५१(२) प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पारखे तपास करीत आहेत.












