न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे आणि पोलीस हवालदार सुभाष पवार हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन (दि ३०) करण्यात आले होते. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदशनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते नियतवयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबियासह शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, मोमेन्टो, झाडाचे रोपटे, भेटवस्तु (साडी), देवुन सत्कार केला. तसेच त्यांच्या भावी आयुष्याकरिता व आरोग्या करिता शुभेच्छा दिल्या.
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) माधुरी कांगणे-केदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन लांडगे, पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी आणि सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार याचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.













