- नगरविकास विभागाचा आदेश जारी; भदाने यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ५ नोव्हेंबर २०२५) :-पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, दोन उपायुक्त आणि एक सहायक आयुक्तांच्या बदली व नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
महापालिकेच्या भांडार विभागाचे उपायुक्त निलेश भदाने यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्याधिकारी (गट अ संवर्ग) चेतना केरूरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महापालिका उपायुक्त कोट्यातील रिक्त पदावर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यंकटेश दुर्वास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, अग्निशमन विभागाचे सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांची बदली परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महापालिकेतील प्रशासकीय जबाबदाऱ्या नव्याने विभागल्या जाणार असून, येत्या काही दिवसांत पदभार स्वीकाराची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.













