- सोडतीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून चंद्रकांत पुलकुंडवार यांची नेमणूक…
 
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे बिहार निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून जाणार असल्याने, महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीकरिता पुणे विभागीय आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांणी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.
महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडतीची तयारी महापालिकेच्या निवडणूक विभागाने सुरू केली आहे. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे बिहार निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून जाणार असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीच्या कामासाठी विभागीय आयुक्त डाॅ.पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
सदर सोडत त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडून त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगास सादर करावा, असेही राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
                                                                    
                        		                    
							












