न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात दिवसाआड पाणीकपात सुरू केली आहे. त्या धर्तीवर शहरात पाणी बचत करण्यासाठी पालिकेचे सर्व १२ जलतरण तलाव बंद करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
याबाबत सामजिक कार्यकर्ते, नगरसेवक आणि सामाजिक संस्था व संघटनांनी तलाव बंदची मागणी केली होती. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्यासंदर्भात सविस्तर माहिती मागविली आहे. पिण्याचे पाणी किती प्रमाणात वापरले जाते, त्याची किती नासाडी होते, तलाव बंद केल्यास काय परिणाम होईल, आर्दीचा अहवाल क्रीडा विभागास सादर करण्याचा सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले की, सद्य:स्थिती लक्षात घेऊन पालिकेचे १२ जलतरण तलाव बंद करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.











