न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- स्वतःचा विवाह आकर्षक व्हावा यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एका नवरदेवाने हेलिकॉप्टरने विवाहस्थळ गाठले. अशोक वाडेकर, असे या नवरदेवाचे नाव आहे.
अशोक याचे लग्न मुळशी तालुक्यातील पूजा देवकर हीच्याशी झाले. त्यांचा विवाह सोहळा हिंजवडी येथे पार पडला. मावळ तालुक्यातील डोणेगाव येथून त्यांच्या घरापासून वाजत गाजत हेलिपॅडच्या ठिकाणी नवरदेव रवाना झाले. तिथून ते हेलिकॉप्टरमध्ये बसून विवाहस्थळी जाऊन विवाहविधी पार पडल्यानंतर पुन्हा आपल्या गावी परतले.
दरम्यान, गावक-यांना व परिसरातील जनतेला या आगळ्या-वेगळ्या प्रकाराचे आकर्षण असल्याने त्यांनी नवरदेवाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे नवरदेव अशोक यांच्याभोवती अंगरक्षकही ठेवण्यात आले होते. अशोक हे एका शेतकरी कुटुंबातील आहेत.











