न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ०८ प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी पिठासीन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सर्व प्रभागांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचे अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवड जाहीर केली.
अ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शर्मिला बाबर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी जाहीर केले. यावेळी नगरसदस्य केशव घोळवे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, शैलेजा मोरे, कोमल मेवानी, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
ब प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी करुणा चिंचवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोधनिवड झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी नगरसदस्य सुरेश भोईर, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, प्रशासन अधिकारी राजू जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते.
क प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी यशोदा बोईनवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी महापौर राहूल जाधव नगरसदस्य राजेंद्र लांडगे, रवि लांडगे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा
बोदडे, प्रशासन अधिकारी प्रदिप मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.
ड प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शशिकांत कदम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी नगरसदस्य सागर आंघोळकर, नगरसदस्या माई ढोरे, चंदा लोखंडे, उषा मुंढे, शारदा सोनवणे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्य्क आयुक्त विजय खोराटे, प्रशासन अधिकारी सिताराम बहुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
ई प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी सुवर्णा बुर्डे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी नगरसदस्य लक्ष्मण उंडे, विकास डोळस, नगरसदस्या प्रियंका बारसे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, प्रशासन अधिकारी मोहन निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
फ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी योगिता नागरगोजे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी नगरसदस्य संजय नेवाळे, प्रा.उत्तम केंदळे, नगरसदस्या कमल घोलप, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ग प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्चना बारणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, अभिषेक बारणे, कैलास बारणे, नगरसदस्या मनिषा पवार, सुनिता तापकीर, सविता
खुळे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, प्रशासन अधिकारी राजेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
ह प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अंबरनाथ कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी यांनी जाहीर केले,
यावेळी नगरसदस्य संतोष कांबळे , नगरसदस्या उषा ऊर्फ माई ढोरे, शारदा सोनवणे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सर्व सभापतींचे अभिनंदन महापौर राहूल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे यांनी केले.











