न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२४) :- सराईत वाहन चोरट्याला जेरबंद करून १३ दुचाक्या व ०२ रिक्षा हस्तगत करुन १५ गुन्हे उघड करण्याची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांनी केली आहे. शंकर भरत देवकुळे (वय ३२ वर्षे रा. सध्या उरुळी देवाची, मुळ रा. फकीरानगर, वैरागनाका ता. जि. धाराशिव) असं अटक आरोपीच नाव आहे. त्याला चोरीची दुचाकी घेवून पिंपरीतील खराळवाडी येथे फिरत असताना (दि. ०५) रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याने पल्सर दुचाकी मेट्रो स्टेशन पिंपरी येथुन चोरल्याची कबुली दिली. मेट्रो स्टेशन परिसरातुन मोठ्या प्रमाणात वाहनचोरीचे गुन्हे घडलेले असल्याने व आरोपी शंकर हा सराईत वाहन चोरटा असल्याने त्याला अत्यंत विश्वासात घेऊन पोलिसांनी कौशल्यपुर्ण तपास केला. त्याने पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर तसेच शांतीनगर भिवंडी येथून एकूण १३ मोटर सायकल व ०२ प्रवाशी वाहतुकीच्या अॅटो रिक्षा बनावट चावीचा वापर करुन चोरल्याची कबुली दिली.
बजाज कंपनीची पल्सर, हिरो होड़ा कंपनीची फॅशन प्लस, बजाज कंपनीची अॅटो रिक्षा, हीरो होंडा कंपनीची पेंशन प्लस, होंडा कंपनीची शाईन, अॅक्टीव्हा मोपेड, यामाहा कंपनीची रे-मॉडेल मोपेड, हिरो स्प्लॅन्डर, होन्डा कंपनीची ड्रीम निओ, स्लेंडर, हिरो कंपनीची स्प्लेंडर, हिरो हॉन्डा, होंडा कंपनीची स्प्लेंडर, बजाज कंपनीची अॅटो रिक्षा, अशी वाहने आरोपीकडून जप्त करण्यात आली आहेत.
आरोपी शंकर भरत देवकुळे हा सराईत वाहनचोरीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असुन पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, धाराशिव, अहील्यानगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनचोरी केल्या असुन सुमारे ७० वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीत हा हॅन्डल लॉक नसलेल्या, मेट्रो स्टेशन व निर्जनस्थळी पार्कींग केलेल्या मोटर सायकली व रिक्षा बनावट चावीचा वापर करुन चोरी करीत होता. चोरीची वाहने अशिक्षीत लोकांना विक्री करुन पैसे कमविण्याचे प्रयत्नात असतांना त्यास गुन्हे शाखेकडून पकडण्यात आले आहे. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित पार्कीग ठिकाणी, हॅन्डल लॉक करुन पार्कीग करावीत व वाहनांचे पार्कीगमध्ये संशयित इसम दिसुन आल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाला माहीती कळवावी असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली आहे.












