- पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे उद्योजकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०८ ऑक्टोबर २०२४) :- चाकण एमआयडीसी परीसरातील वाहतूक जाम, रस्ते, अवजड वाहनांची पार्किंग, कचरा आदी महत्वाच्या विषयांवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची बैठक पार पडली. समस्या सोडविण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना तसेच भविष्यातील आराखाडयाबाबत माहीती देण्यात आली.
बैठकीस बापु बांगर, पोलीस उप आयुक्त, वाहतुक विभाग, डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ०३, राजेंद्रसिंह गोर, सहा. पोलीस आयुक्त, चाकण विभाग, अनिल कोळी, सहा. पोलीस आयुक्त, वाहतुक विभाग, सतिश चौडेकर, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी विभाग, संदेश चव्हाण, प्रादेशिक परीवहन अधिकारी, दिलीप शिंदे, उप अभियंता, एनएचएआय, निखील वाळके, सहा. कामगार आयुक्त, माथाडी बोर्ड, राम विजे नायब तहसिलदार, खेड, व जितेंद्र पगार, सेक्शन इंजिनिअर, पीएमआरडीए तसेच नितीन गिते, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन, देवेंद्र चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, प्रमोद वाघ, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस स्टेशन व दिगंबर सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग, चाकण एमआयडीसीमधील टेट्रा पॅक कंपनीचे संतोष सोनटक्के व विशाल देशमुख, महेश खर्डेकर, मर्सिडीज कंपनीचे सारंग जोशी, न्यू हॉलंड कंपनीच्या शितल साळुंखे तसेच महाळुंगे व चाकण, एमआयडीसीमधील विविध कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील महाळुंगे भागातील औद्योगिक परिसराकरीता सन २०२३ मध्ये महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणेची वेगळी निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यास ०२ पानि, ०६ अधिकारी व एकूण १०७ पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे
नागरीकांनी ११२ हा क्रमांक डायल केल्यानंतर अंदाने पुढील ५ ते ६ मिनीटात त्यांना पोलीस मदत उपलब्ध होते. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तीनी सदर सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच जास्तीत जास्त प्रसार करावा. औद्योगिक तक्रारीचे तात्काळ निवारण होणेकरीता पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे गुन्हे शाखेच्या अंतर्गत येणा-या खंडणी विरोधी पथकामध्ये औद्योगिक तक्रार निवारण कक्ष (इंडस्ट्रियल प्रिव्हियन्स सेल) स्थापन केल्याची माहिती देण्यात येवून, त्याव्दारे औद्योगिक परीसरातील समस्यांची त्वरीत सोडवणूक केली जाते. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत एकुण ०६ गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्यांतर्गत एकूण ३९१ गुंडांवर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत एकूण २५ गुंडांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे एकुण २६ गुंडांना पुणे जिल्ह्यातुन हदपार करण्यात आलेले आहे. कोणतीही समस्या, दादागीरी, अडचण, तसेच माथाडी कामगारांच्या संबंधी काहीएक तक्रार असल्यास, समक्ष पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी, तसेच पोलीस आयुक्तालयामधील खंडणी विरोधी पथकांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या ओद्योगिक सकार निवारण कक्ष (इंडस्ट्रियल विव्हियन्ना सेल) येथे सकार केल्यास तात्काळ मदत मिळेल. कंपनी व्यवस्थापनाने कंपनीच्या आतील भागाप्रमाणेच कंपनी बाहेरील जागेमध्ये, सार्वजनिक रस्त्यावर चांगल्या दर्जाचे हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कैमेरे बसविण्याबाबत आवाहन करून सदर कैमरे यांची साठवणूक क्षमता किमान ३० दिवसांची असावी अशी सुचना केली. कंपनी व्यवस्थापनाने त्यांचे कामगारांचे मोटारसायकल व चारचाकी गाड्या या कंपनीचे बाहेर रोडबर पार्किंग न करता, कंपनीचे मेटचे आत पार्किंगची सोय करावी, जेथे पार्किंग करणे शक्य नसल्यास तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. तसेस सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा. कंपनी व्यवस्थापनाची काहीएक तक्रार असल्यास, त्यांनी पुढे येवून तक्रार दिल्यास, पोलीस विभागाकडून त्यांना तात्काळ मदत मिळून, गुन्हेगारांवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे सांगून, महाळुंगे एमआयडीसीमध्ये भयमुक्त वातावरण ठेवण्याचा उद्देश असल्याचे सांगीतले. एमआयडीसी भागात असलेले कारखाने टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यात कोणी स्थानिक गुंड, कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण कंपनी व्यवस्थपनास त्रास देत असल्यास, त्यांचेवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगीतले.