- अजित पवारांकडुन पुन्हा या मतदारसंघावर दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 9 ऑक्टोबर 2024) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना अधिक मतदान झाले होते. यावरून अजित पवार विधानसभा निवडणुकीवेळी आपला मतदारसंघ बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
बारामतीला नवा आमदार मिळेल, असे विधान करून अजित पवार यांनी स्वतः जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.
चिंचवडसह शिरूर मतदारसंघातून लढण्यासंदर्भात ते आढावा घेत असल्याचीही चर्चा होती. मात्र, पटेल यांनी अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.