- चाकण पोलिसांकडून बुलेट चोरांची टोळी जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १६ ऑक्टोबर २०२४) :- चाकणमधून बुलेटची चोरी करणारा चोरटा चोरी करुन संगमनेर शहरामध्ये जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यामुळे संगमनेर येथील बुलेट चोराबाबत माहिती काढली. चाकण पोलीसांच्या डी. बी. पथकाने संगमनेर येथे जाऊन कारवाई करीत आरोपीला सापळा रचून अटक केली. अभय सुरेश खर्डे (वय २३ वर्षे, रा. झोळे ता. संगमनेर जि. अहमदनगर, हल्ली रा. गुजाळ मळा, लक्ष्मी नगर, गुंजाळवाडी रोड संगमनेर, जि. अहमदनगर) असं अटक आरोपीचे नाव आहे.
तसेच विक्रीमध्ये सहभागी असणारे रविंद्र निवृत्ती गव्हाणे (वय २३ वर्षे, रा. आंजनापुर ता. कोपरगाव जि. अहमदनगर), सुभम बाळासाहेब काळे (वय २४ वर्षे, रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव जि. अहमदनगर), यश नंदकिशोर थुटटे (वय २२ वर्षे, रा. चिखली बुलढाणा हल्ली रा. अशोकनगर, नाशिक), प्रेम भाईदास देवरे (वय २० वर्षे, रा. श्रमीक नगर, यशवंत अपार्टमेंट, चौथा मजला. अशोक नगर, नाशिक, मुळ रा.डोंगराळे ता. मालेगाव जि. नाशिक) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या ११ बुलेट, हिरो होंन्डा स्प्लेंडर ०६ व यमाह आर १५ – ०१ अशा १८ मोटार सायकली एकूण २६,००,००० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.
तपासा दरम्यान चौकशी केली असता आरोपी अभय हा ऑनलाईन गेम खेळण्याच्या सवयीचा होता. ऑनलाईन गेममध्ये तो यापूर्वी खूप पैस हारल्यामुळे पैस कमावण्याकरीता आरोपीने व त्याच्या साथीदारांनी माहगडया बुलेट गाड्या चोरी करुन पैसे मिळविले. हे पैसे पुन्हा ऑनलाईन गेममध्ये हरले.















