न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२४) :- पुरोगामी विचारांचा पुरस्कार करीत शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून महाराष्ट्र नेहमीच देशात अग्रेसर राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आगामी विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत घेण्यात आला आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मुफ्ती अहमद हसन कासमी यांनी दिली.
सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेच्या वतीने बुधवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बिशप सॅम्युअल साखरपेरकर, पास्टर नितीन काळे, शौल विश्वास कांबळे आदींसह विविध समाज प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विकासात पिंपरी चिंचवड कामगार नगरीचे उल्लेखनीय योगदान आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी राखीव मतदार संघातून नवीन, सुशिक्षित युवकाला संधी मिळावी अशी मागणी या सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत करण्यात आली.


















