न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२४) :- सीबीआयचे बनावट आयकार्ड दाखवत सीबीआयचे अधिकारी असलेची बतावणी केली. कंपनीची फाईल सीबीआय येथे चौकशी कामी आली असल्याची धमकी देत फाईल क्लोज करण्यासाठी १२ लाख रुपयांची मागणी करून रक्कम घेण्याचा प्रयत्न केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २२) रोजी सकाळी ०९/३० ते (दि. २४) रोजी सायंकाळी ०७.४० वाजण्याचे दरम्यान सेफटेक्नो सर्व्हिसेस कंपनी, एनडीए पाषाण रोड, बावधन या ठिकाणी घडली.
याप्रकरणी सुहास अशोकराव वानखडे (वय ४० वर्ष व्यवसाय सेफ टेक्नो सर्व्हिसेस, रा. बावधन) यांनी आरोपी विनोद आण्णाप्पा थोरवत (वय-३९ वर्ष रा-केदार कॉलनी, गिजवणे, ता गडहिंग्लज, जि कोल्हापुर) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
बावधन पोलिसांनी १२१०/२०२४ भारतीय सुरक्षा संहिता २०२३ चे कलम २०४, ३०८ (३), ३३६(३)(४), ३३८, ३४०, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि ठाकुर पुढील तपास करीत आहेत.











