न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑक्टोबर २०२४ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ६ अश्या एकूण २३ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशिला जोशी, कर्मचारी महासंघाचे नथा मातेरे आणि महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे ऑक्टोबर २०२४ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता दत्तात्रय रामगुडे, कार्यालय अधिक्षक लिंबाजी गभाले, मुख्य आरोग्य निरीक्षक सतिश पाटील,मुख्याध्यापिका सुनिता जमदाडे, क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवे, सुरक्षा निरीक्षक ज्ञानदेव भांडवलकर, मुख्य लिपिक नितीन कदम, उपशिक्षक विद्यादेवी ठुबे, उदयभान मिश्रा, जनरेटर ऑपरेटर विजय पाटील, इले. मोटार पंप ऑपरेटर रामाशंकर प्रसाद, वॉर्डबॉय सदानंद साबळे, मजूर अशोक नाणेकर, सुरेश कदम, सुनंदा तिकोणे, सफाई सेवक कुमार बनसोडे, मुकादम अशोक सुदाम रणदिवे यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई सेवक उज्वला कांबळे, राजाराम उरणकर, कल्याणी अष्टगे, सुरेश सोळंकी, गटरकुली आनंद मोरे, अनिल गायकवाड यांचा समावेश आहे.