- जरांगे पाटील यांच्या लोकप्रियेतेमुळे संतोष लांडगे यांचा विजय पक्का?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 31 ऑक्टोबर 2024) :- मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला साथ देत भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते व भाजपच्या नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती संतोष लांडगे यांनी भोसरी विधानसभेतून अर्ज भरला आहे.
त्यांनी भरलेल्या अर्जामुळे आता भोसरीतून महेश लांडगे, रवी लांडगे यांच्यानंतर आता संतोष लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भोसरी विधानसभेच्या निवडणुकीत रंगत आली असून संतोष लांडगे यांचा विजय नक्की असल्याची चर्चा भोसरी राजकीय वर्तुळातून होत आहे.
संतोष लांडगे यांनी या अगोदरही दोन हजार नऊमध्ये भोसरी विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे. त्यावेळी त्यांनी निर्णयाक मतदान घेतल्यामुळे विलास लांडे यांचा निसटता विजय झाला होता. अन्यथा त्या ठिकाणी शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांचा विजय झाला असता.
भोसरी परिसरात संतोष लांडगे यांची वैयक्तिक ताकद आणि जरांगे पाटील यांच्या निर्णयामुळे मराठा समाजाने संतोष लांडगे यांच्या पारड्यात जर मते टाकली तर संतोष लांडगे हे निर्णायक मतदाना पेक्षाही जास्त मते खाऊ शकतात. जर त्यांच्या पारड्यात भोसरी व जरांगे समर्थक मतदारांनी मते टाकली तर भोसरी विधानसभेची विजयाची गणिते कुणाच्या बाजुला झुकनार हे वेगळे सांगायची गरज नाही.
संतोष लांडगे यांच्या उमेदवारीमुळे भोसरीत चर्चेला उत…
संतोष लांडगे हे भाजपा समर्थक असून त्यांच्या पत्नी सारिका लांडगे 2007 च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष नगरसेविका म्हनून निवडून आल्या होत्या. तर 2019 च्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडणुक लढवून विजयी झाल्या होत्या. तसेच महापालिकेच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम देखील केले होते. यामुळे संतोष लांडगे व सारिका लांडगे यांना माननारा मोठा वर्ग भेसरीत कार्यरत आहे. सध्या भोसरीत काटे की टक्कर असताना संतोष लांडगे यांची उमेदवारी नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार. कुणाला तारणार की पाडणार याबाबत भोसरी मतदार संघात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.