न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२४) :- मित्रासह तरून हातगाडयावरील बर्फाचा गोळा खात होता. त्यावेळी चौघेजन तिथे आले. त्याला ‘आज तुला खल्लास करतो, तुझा गेमच करतो तुला माज आलाय, तु मागच्या वेळेस सुटलास’ असा दम भरला. जबरदस्ती तरुणाचे रिक्षात घालून अपहरण करुन यशोदा कॉलनीत आणले. हातात लोखंडी रॉड तसेच लाकडी फळी घेवून डाव्या हाताच्या मनगटावर, दोन्ही खांदयावर, नाकावर, डोक्यावर तसेच उजव्या पायाच्या नडगीवर मारून गंभीर जखमी करून तरुणाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०३) रोजी दुपारी ०४.३० ते ०४.५५ वाजेच्या दरम्यान संतोष मिनी मार्केटसमोर, दत्तनगर कॉलनी व यशोदा कॉलनी, नखाते नगर कमानीसमोर, रहाटणी येथे घडला.
याप्रकरणी रोहन सुनिल जाधव (वय १९ वर्षे, रा. अमरदीप कॉलनीसमोर, दत्तनगर कॉलनी, रहाटणी) याने आरोपी १. संकेत लोखंडे वय २२वर्ष, रा. काळेवाडी, २. आर्यन कुचेकर, वय २१, रा. काळेवाडी, ३. सिध्दांत वाघमारे, रा. काळेवाडी, ४. अशोक लोखंडे, वय ५५ वर्ष रा. काळेवाडी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड (काळेवाडी) पोलिसांनी १२०४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९,१४० (१),३५१ (२) (३),३ (५) सह क्रिमिनल लॉ अॅमेडमेंट अॅक्ट कलम ३,७ प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी क्रं १ व २ अटक आहेत. पोउपनि नाईक निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.











