- ‘सामान्य कष्टकरी वर्गाच्या प्रश्नासाठी राहिल मी सदैव दक्ष’….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- स्वराज्य शक्ती सेनेचे भोसरी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार जावेद शहा यांनी जाधववाडी प्रभागात शनिवारी (दि. १५) प्रचार फेरी काढली. यावेळी तेथील अनेक कष्टकरी वर्गातील मतदारांशी जावेद शहा यांनी संवाद साधून सामान्य कष्टकरी वर्गाच्या सर्वच समस्यासाठी मी सदैव दक्ष राहून प्रत्येक नागरीकांच्या समस्या दुर करण्यावर लक्ष ठेवेन, असे आश्वासन दिले.

यावेळी जाधववाडीमधील अनेक समस्या बाबत मतदारांशी चर्चा करुन जावेद शहा यांनी याबाबत मजूर प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचा निष्काळजीपणा यामुळे जाधववाडी प्रभागातील नागरीकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगून ही सर्व परस्थिती बदलायची असेल तर संधीसाधू उमेदवार व प्रस्थापित राजकीय वर्गाला घरी बसवा, असे आवहान यावेळी जावेद शहा यांनी केले आहे.
यावेळी जावेद शहा यांनी जाधववाडी, कुदळवाडी, चिखली घरकुल, भिमशक्ती नगर आदी परीसरात देखील प्रचार फेरी काढून मतदारांची भेट घेऊन हिरा या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन केले.
कष्टकरी वर्गाच्या समस्या जैसे थेच…
जाधववाडीमधील बहुतांश नागरीकांना पाण्याच्या जटील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यापासून उच्चभ्रु सोसायटीमधील नागरीक देखील सुटले नाहीत. या बरोबरच सततच्या संतगतीत सुरु असलेल्या विकासाकामामुळे येथील परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी सुरु असून येथील नागरीक हैराण झाले आहेत. त्याबरोबर वैद्यकीय सेवासुध्दा अपुऱ्या प्रमाणात असल्यामुळे येथील अनेक समस्या जैसे थेच आहेत. यासाठी नागरीकांनी माझ्या हिरा या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावे.
जावेद शहा, उमेदवार भोसरी विधानसभा (स्वराज्य शक्ती सेना)…
















