न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक – पालक – विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत तसेच राहुल गायकवाड (इंदिरा गांधी हायस्कूल) व पूजा निकम उपस्थित होते.
शाळेतील विविध उपक्रम,जनजागृती कार्यक्रम,विदयार्थी पालक मेळाव्याच्या मुख्य उद्देश, महत्व,कारण,भूमिका उपस्थित पालकांना आपल्या खास प्रास्ताविकातून निशा पवार आढावा घेतला.
शाळेच्या प्रगतीविषयी व पालक मेळावा आयोजना पाठीमागची भूमिका,ध्येय,उद्देश,मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. आज या आधुनिकतेमुळे मुले टर्निंग पॉइंटला वेगळ्याच ट्रॅक जात आहे हे पालकांनी दुर्लक्षून चालणार नाही. शाळेच्या विविधांगी उपक्रमास शुभेच्छा व्यक्त करून शाळेचे कौतुक उपमुख्याध्यापक श्री सचिन कळसाईत सरांनी केले.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही नवनवीन साधनतंत्राचा अवलंब करून या मुलांना घडवुन त्यांना अंधाराकडून- प्रकाशाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहा नक्कीच ही आजची मुले जगाच्या पाठीवर आपल्या देशाचे भविष्य सार्थक ठरवतील असे विचार व्यक्त करून पालक मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शक संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थी, पालकांना संबोधित केले.
आजच्या या काळामध्ये स्पर्धेत जर टिकायचे असेल तर आपल्या लेकरांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. शिक्षण ही एक बदल घडवणारे शस्त्र आहे ते चालवण्याचे सामर्थ्य आपण आपल्या मुलांना करून दिले पाहिजे असे मार्गदर्शन अनिता रोडे यांनी पालक मेळाव्या प्रसंगी उपस्थित पालकांना आपले विचार व्यक्त केले.
स्वाती वक्टे यांनी शाळेच्या प्रगतीचा सर्वंकष आढावा घेऊन शाळेच्या प्रगतीविषयक उपक्रमाचे अवलोकन करून दिले, विदयार्थी हे शाळेचे मुख्यघटक आहेत. पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.शाळेविषयी असणाऱ्या कल्पना पालकांना सांगितल्या.शाळेची शिस्त, गणवेश,प्रगती खूप महत्त्वाची आहे त्यासाठी न्यू सिटी प्राईड स्कूल परिवारातील सर्व शिक्षक वृंद खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतात याचा मला सार्थ अभिमान वाटतो त्यासाठी आम्ही विविध उपक्रम शाळेत राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहू त्यासाठी तुम्ही साथ द्या.काही अडचण, समस्या असतील तर त्या सुधारण्यासाठी तुम्ही नेहमी शाळेच्या संपर्कात रहा असे आपल्या खास मार्गदर्शनातून आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेतील ही छोटी मुले उद्याचे आपले भविष्य आहे.शाळेत मुलांना गोवर व रुबेला लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली त्याचे महत्व उपस्थित पालकांना आपल्या खास शैलीत पूजा देवगिरी यांनी व्यक्त केले तसेच गोवर व रुबेला पालकांसाठी लसीकरण शासनाने मोफत उपलब्ध केले आहे. आपल्या मुलांना हे लसीकरण करा असे विचार व्यक्त करून त्यांनी पालक, माता वर्ग यांना संबोधित केले.
आपले मुले आपण मोठ्या आत्मविश्वास निर्माण करून तुम्ही आमच्याकडे पाठवता त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण, अभ्यास खूप काळाची गरज आहे अतिशय रोचक अशा मार्गदर्शनातून रेणू राठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले
ज्ञान हे मिळवावे लागते त्यातून व्यक्ती घडत असतो. चांगले शिक्षण,चांगले कर्म मानवास माणूस बनवतो ,उत्तम कार्य केल्याने उत्तम होते. शिक्षणाची गोडी ज्याला लागेल तो यशस्वी नक्कीच होतो परंतु आज परिस्थिती खूप बदलत गेली आहे. मुले अभ्यासाकडे लक्ष कमी व इतर मोबाईल खेळ यामध्ये वेडून गेली आहेत, याचा त्याच्या मनावर परिणाम होतो आहे, म्हणून पालकांनी आपल्या मुलांवर नजर ठेवून नेहमी अभ्यास, चांगल्या संस्काराने शिक्षीत करणे गरजेचे आहे.शासनाच्या आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या गोवर व रुबेला लसीकरण मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे .आपल्या मुलांना,पाल्याना या लसीकरणापासून वंचीत ठेवू नका असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मत माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव यांनी व्यक्त करून शाळेच्या विविधांगी उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
या विद्यार्थी, पालक, मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निशा पवार यांनी केले तर आभार सौ. भावना देवरे यांनी मानले

















