- तिकिटाचा रोल आणि त्यावर पीएमपीएमएल प्रशासनाचा लोगो…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२४) :- पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीएमएल प्रशासनाची इभ्रत चक्क रस्त्यावर पडल्याची घटना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर नुकतीच घडली.
प्रवाशांना ज्या इलेक्ट्रोनिक मशीनमधून तिकीट देण्यात येते त्या तिकिटाचा कोरा रोल अक्षरशः रस्त्यावर पडलेला आढळला. त्या रोलवर पीएमपीएमएल प्रशासनाचा लोगो असून बाकीचा भाग कोरा आहे.
याबाबत महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील रखवालदाराच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला असता. त्यांनी तो रोल उचलून त्याची विल्हेवाट लावली. मुळात हा रोल इथे कसा आला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

















