- विसाव्या फेरीअखेर महायुतीचे महेश लांडगे यांना ५६,००७ हजार मतांची आघाडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२४) :- विसाव्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार महेश लांडगे ५६,००७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १,८८,३८३ तर महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना १,३२,३७६ इतकी मते मिळाली आहेत. ते मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. अद्याप मतमोजणीचे तीन राउंड बाकी आहेत.
भोसरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवारी जाहीर होत आहे. या निवडणुकीत प्रमुख उमेदवार हे महायुती भाजपचे महेश लांडगे तर, प्रमुख विरोधक महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे हे आहेत.
















