- एकोणिसाव्या फेरीअखेर महायुतीचे अण्णा बनसोडे यांची मोठ्या मतांची आघाडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवारी जाहीर होत आहे. या निवडणुकीत प्रमुख उमेदवार हे महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे तर, प्रमुख विरोधक महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत या आहेत. एकोणिसाव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना १,०५,५५० तर, शीलवंत यांना ६८५७० इतकी मते पडली आहेत. अठराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे ३६,९८० इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
या मतदारसंघात सुरुवातीपासूनच अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत अण्णा बनसोडे यांना ७४८४, दुसऱ्या फेरीत १४१३८ आणि तिसऱ्या फेरीत १९७५९ इतके मते मिळाली आहेत.
तर सुलक्षणा शीलवंत यांना पहिल्या फेरीत ३४६६, दुसऱ्या फेरीत ६६०१ तर तिसऱ्या फेरीत ९९५२ इतकी मत मिळाली आहेत.
तिसऱ्या फेरीअखेर अण्णा बनसोडे हे तब्बल २१३६२ मतांनी आघाडीवर आहेत.
पाचव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना ३२२८६ तर शीलवंत यांना १७२०० इतकी मते पडली आहेत. पाचव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे १५०८६ इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
सहाव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना ४०६३६ तर शीलवंत यांना २०८५७ इतकी मते पडली आहेत. पाचव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे १९७७९ इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
तेराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना ७३३८५ तर शीलवंत यांना ४७३५७ इतकी मते पडली आहेत. तेराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे २६०२८ इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
पंधराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना ८४,१३८ तर, शीलवंत यांना ५३,२५९ इतकी मते पडली आहेत. पंधराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे ३०,८७९ इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
सोळाव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना ९०५८४ तर, शीलवंत यांना ५७२५५ इतकी मते पडली आहेत. सोळाव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे ३३,३२९ इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
सतराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना ९५७६५ तर, शीलवंत यांना ६१३३१ इतकी मते पडली आहेत. सतराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे ३४,४३४ इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
अठराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना १०१,९३१ तर, शीलवंत यांना ६५,३५३ इतकी मते पडली आहेत. अठराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे ३६,५७८४ इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
एकोणिसाव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे यांना १,०५,५५० तर, शीलवंत यांना ६८५७० इतकी मते पडली आहेत. अठराव्या फेरीअखेर अण्णा बनसोडे ३६,९८० इतक्या मतांनी आघाडीवर आहेत.
















