- पाचवी व आठवीमधील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा शिक्षण विभाग महापालिकेच्या शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव देण्यासाठी दरवर्षी अभ्यास दौऱ्यावर पाठवीत आहे. यावर्षीसुद्धा महापालिकेने पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सदर विद्यार्थी २ डिसेंबर रोजी सहा दिवसांसाठी बंगळुरू, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर येथे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
मागील वर्षी भारत दर्शन अभ्यास दौरा विद्यार्थी,पालक व शिक्षकांसाठी शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवांचे मिश्रण साधणारा एक आदर्श उपक्रम ठरला. सदर यशस्वी उपक्रमातून महापालिकेने यावर्षी सुद्धा परंपरा सुरू ठेवली आहे.
यावर्षीच्या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भारतीय विज्ञान संस्था या प्रतिष्ठित संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार असून विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांशी संवाद साधता येणार आहे. त्यासोबतच,अंतराळ संशोधनाच्या क्षेत्राचा अभ्यास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळणार आहे. या अभ्यास दौऱ्यावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा समावेश आहे.
भारत दर्शन अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सुरू केला आहे. यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे विचारविश्व अधिक व्यापक होऊन त्यांना अनोखी प्रेरणा मिळण्यासाठी आम्ही कायम वचनबद्ध आहोत. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
“शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा त्यांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. विद्यार्थी अशा प्रेरणादायी प्रवासाचा भाग बनत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. – विजय थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका…













1 Comments
tlovertonet
Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. It extremely helps make reading your blog significantly easier.