- महापलिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपसह घटक पक्षात इनकमिंग वाढणार..
- एका जागेसाठी चार ते पाच जण इच्छुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२४) :- विधानसभेला शहरातील चिंचवडमधून सर्वाधिक मतांची आघाडी घेऊन भाजपचे आमदार शंकर जगताप विजयी झाले, तर भोसरीतून महेश लांडगे यांनी हॅट्ट्रिक साधली. पिंपरीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे निवडून आले. त्यामुळे शहरात महायुतीचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. पालिका निवडणुकीत अस्तित्व टिकविण्यास ‘मविआ’ला बूस्टरची गरज असली तरी नवख्यांना मात्र दारे खुली झाली आहेत.
तिन्ही मतदारसंघांत विजयी झाल्याने महायुती जोमात आहे. दुसरीकडे शहरात आजच्या घडीला महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीतून महाविकास आघाडीत पक्षप्रवेश झाले होते. आघाडीला आलेले अपयश पाहता या नेत्यांची घरवापसी झाली तर आश्चर्य वाटू नये. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
भाजप-शिंदेसेनेत इनकमिंग वाढणार…
महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काही दिवसांत महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेमध्ये इनकमिंगची संख्या वाढणार असून, सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे. मार्च महिन्याच्या आधी महापालिका निवडणुकांचे संकेत आहेत.
दुसऱ्या फळीतील तरुणांना संधी…
• विधानसभा व लोकसभा निवडणुकांपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीची गणिते वेगळी असतात. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद कमी झाली असली तरी दुसऱ्या फळीतील कार्यकत्यांना मात्र, महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे.
• महायुतीमध्ये एका जागेसाठी चार ते पाच जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तिकीट देताना मात्र महायुतीत कसरत होणार असल्याचे आतापासूनच दिसून येत आहे.













1 Comments
Tuan Rosewell
You completed a few fine points there. I did a search on the subject and found nearly all persons will consent with your blog.